मासरूळ जि.प. सर्कल मुख्य पदाधिकारी बैठकीचे आयोजन मेळाव्यात रूपांतर..!* एकनिष्ठ *जालिंदर बुधवत* यांचे जनतेच्या मनावरील अधिराज्य सिद्ध..!
-
*मासरूळ जि.प. सर्कल मुख्य पदाधिकारी बैठकीचे आयोजन मेळाव्यात रूपांतर..!*
एकनिष्ठ *जालिंदर बुधवत* यांचे जनतेच्या मनावरील अधिराज्य सिद्ध..

- मासरुळ जि प सर्कलच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती. सोयाबीनचा हंगाम असूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख यांच्या वरील प्रेमापोटी पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि बैठकीत रूपांतर मेळाव्यात झाले.या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, मेकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, डी एस लहाने सर,सुमित सरदार, युवा शिवसेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर,तालुकाप्रमुख विजय इतवारे,अनिल नरोटे, अशोक गव्हाणे डॉ अरुण पोफळे, गजानन उबरहंडे,सुनील गवते,दिलीप सिनकर, हरिभाऊ सिनकर,एकनाथ कोरडे,संजय गवळी, गणेश पालकर यांचेसह सरपंच उपसरपंच व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- “मी पदाधिकाऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या भरोशावर निश्चिंत असल्याचे यावेळी *जालिंदर बुधवत* यांनी प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला म्हणजेच “मशालला” विजयी करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
मासरुळ सर्कल मध्ये मशाल पेटवण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.