बुलढाणा ..
*जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक; 61 जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडत जाहीर*…
बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली.
*बुलढाणा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे :* अनुसूचित जाती एकूण 12 जागेपैकी सर्वसाधारण 6, महिला 6, अनुसूचित जमाती एकूण 3 जागेपैकी सर्वसाधारण 1, महिला 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 16 जागेपैकी सर्वसाधारण 8 महिला 8, सर्वसाधारण एकूण 30 जागेपैकी सर्वसाधारण 15, महिला 15 अश्या एकूण 61 जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली.
या सोडतीच्या प्रक्रियेस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार संजय बगाडे आदींसह संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
00000

