*78 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची व्यापक पूर्वतयारी साठी बुलडाना जिल्ह्यातील खामगाव येथून व महाराष्ट्रातील हजारो स्वयंसेवक समर्पित करत आहेत त्यांच्या निष्काम सेवा…..

संत निरंकारी मिशनचा 78 वा वार्षिक संत समागम, गतवर्षांच्या दिव्यता आणि गौरवशाली परंपरेशी सुसंगत राहून, या वर्षीही 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, 2025 दरम्यान संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे अत्यंत भव्यरूपात, श्रद्धापूर्ण आणि आध्यात्मिक उत्साहात साजरा होणार आहे. हा दिव्य सोहळा सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पवित्र सान्निध्यात संपन्न होणार असून, या आनंदवार्तेने सर्व श्रद्धाळू भक्तांच्या अंत:करणात अगणित हर्ष आणि आध्यात्मिक ऊर्जा संचारली आहे.
या वर्षीचा वार्षिक समागम “आत्ममंथन” या विषयावर आधारित आहे. हा समागम म्हणजे भक्तांसाठी एक अद्वितीय अध्यात्मिक प्रवास आहे, जिथे ते ब्रह्मज्ञानाच्या आत्मिक प्रकाशात सेवा, नामस्मरण आणि सत्संगाच्या माध्यमातून आनंद व प्रेमाभक्तीचा अनुभव घेतील.
या दिव्य उत्सवाची तयारी अत्यंत श्रद्धा, निष्ठा आणि निस्वार्थ भावनेने केली जात आहे. श्रद्धाळू भक्तगण वयस्कर असो वा युवा, पुरुष असो किंवा स्त्रिया सर्वजण मनोभावे सेवेत मग्न आहेत. समागमस्थळी पहाटेच्या पहिल्या किरणापासून ते सायंकाळच्या संध्या प्रकाशापर्यंत प्रत्येक ठिकाणी भक्तिभावाने समर्पित सेवेचे अलौकिक दृश्य दिसून येत आहे. इथे कोणी माती उचलत आहे, कोणी निवासी तंबू बांधत आहे, कोणी स्वच्छता करत आहे तर कोणी पाणीपुरवठा व भोजन व्यवस्थेची सेवा पाहतो आहे. बुलडाना जिल्ह्यातील खामगाव तसेच महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक समागमाच्या पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा समर्पित करत आहेत.
78 व्या वार्षिक संत समागमाची भव्यता दर्शवणारे मुख्य प्रवेशद्वारही आता आकार घेऊ लागले आहे, जे प्रेम, समरसता आणि आत्मिक एकत्वाच्या यात्रेचे प्रतीक ठरणार आहे. हे सर्व त्या समर्पण भावनेचे प्रमाण आहे, जी सतगुरुंच्या ज्ञानातून उत्पन्न होते. जसे म्हटले गेले आहे, की “जिथे सेवेत समर्पण असते, तिथे प्रत्येक क्षण उत्सव बनतो.”
सेवाभावाच्या या अद्वितीय दृश्यात स्पष्टपणे जाणवते, की या सेवादारांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हे, तर आनंद आणि उत्साहाचे तेज झळकत आहे. हा तोच दिव्य आनंद आहे, जो फक्त सतगुरुंच्या छत्रछायेत राहून सेवा आणि भक्तीच्या माध्यमातून अनुभवता येतो. सतगुरु माताजी सुद्धा नेहमी आपल्या प्रवचनांमधून प्रेरणा देतात, की “तन पवित्र सेवा केली, धन पवित्र दिले दान, मन पवित्र हरिभजनाने, त्रिविध होई कल्याण.”
समागमात केवळ देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर विदेशांतूनही लाखो श्रद्धाळू भक्तगण सहभागी होण्यासाठी येतात. त्यांच्या स्वागत आणि सुविधांसाठी सर्व आवश्यक व्यवस्था अत्यंत काटेकोर आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली जात आहे. रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि विमानतळांवर निरंकारी सेवादलाचे अनुशासित व सुसज्जित सेवक आपल्या निळ्या व खाकी गणवेशात, श्रद्धाळूंचे आदरपूर्वक स्वागत करून त्यांना समागमस्थळी पोहोचवण्यासाठी सतत तत्पर राहतील.
निःसंशयपणे, हा समागम केवळ एक साधारण धार्मिक कार्यक्रम नसून मानवतेच्या उत्थानाचा आणि समरसतेच्या जागृतीचा एक अनुपम उत्सव आहे जिथे विविध संस्कृती, भाषा आणि प्रांतातून आलेले श्रद्धाळू भक्तगण “वसुधैव कुटुंबकम्” या भावनेला आत्मसात करून, सतगुरुंच्या अमृतवाणीमधून आपले अंतःकरण प्रकाशमय करतील. या पवित्र प्रसंगी अशा सर्व सज्जन, बंधु-भगिनी यांचे मन:पूर्वक स्वागत आहे, जे प्रेम, शांती आणि समरसतेच्या या दिव्य महायज्ञाचा भाग बनू इच्छितात.

