-3.5 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुर्दैवी हत्या* *बापानेच दोन जुळ्या मुलींची गळा कापून केली हत्या…!* *पती पत्नीतील वादातून दुहेरी हत्याकांडने जिल्हा हदरला.*

*बुलढाणा ब्रेकिंग*

*अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुर्दैवी हत्या*

*बापानेच दोन जुळ्या मुलींची गळा कापून केली हत्या…!*

*पती पत्नीतील वादातून दुहेरी हत्याकांडने जिल्हा हदरला.*

बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज एका अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून यामुळे समाजमन सुन्न झालं आहे. रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण, जो पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करतो, याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान नवरा-बायको यांच्यात वाद सुरु झाला. या वादात रागाच्या भरात पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर राहुल आपल्या मुलींसह पुढे निघाला. रागाने भरलेल्या स्थितीत खामगाव – जालना मार्गावरील अंढेरा फाटा जवळील जंगलात त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा कापून निर्दयपणे हत्या केली.
घटनानंतर राहुलने स्वतः वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबूली दिली. पोलिसांनी तत्काळ अंढेरा पोलिसांना संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटना स्थळ गाठून मृत चिमुकल्यांचे मृतदेह हस्तगत केले आहेत.संपूर्ण परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. सध्या आरोपी राहुल अंढेरा पोलीसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या