गोंडवैदू पारधीनच्या पालावर डॉ बछिरे यांची भाऊबीज साजरी…
दरवर्षीप्रमाणे पारधी, गोंडवैदूंच्या पालावर शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी भाऊबीज केली साजरी
लोणार
सामाजिक सलोखा, उचनीचतेची दरी दूर करण्याच्या हेतूने व सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे हे रक्षाबंधन व भाऊबीज हे सण पारधी, गोंडवैदू समाजाच्या माता भगिनींसोबत साजरा करून त्या माता भगिनींना साडी चोळी व मिठाईचे वाटप करतात, याहीवर्षी आपल्या सहकाऱ्यांसह लोणार येथील गोंडवैदूचे पाल, शारा येथील पारधी समाजाच्या वस्तीतील जाऊन त्यांच्यासह भाऊबीज साजरी केली असता माता भगिनींनी त्यांना ओवाळून दीर्घायुष्याची कामना केली याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ बछिरे यांनी समाजातील एकता व अखंडता, वाचाल तर वाचाल, म्हणजेच शिकाल तरच तुमचं अस्तित्व टिकून राहील अन्यथा तुमच्या अस्तित्वा सोबत तुमची संस्कृतीही संपुष्टात येईल त्याकरिता आपल्या मुलांना शिकवा पारधी समाज हा अशिक्षित असल्या कारणाने कोणताही अपराध झाला तर संशयाची सुई त्यांच्याकडे वळते कायद्याचं ज्ञान नसल्याकारणाने हा समाज निमुटपणे अन्याय सहन करतो म्हणून समाजात शिक्षण महत्त्वाचे आहे आणि आपल्या मुला बाळांना सुशिक्षित करा उच्च शिक्षण द्या त्यासाठी वाटेल ते सहकार्य करण्यास मी सज्ज आहे असे अभिवचन डॉ. बछीरे यांनी गोंडवैदू व पारधी समाजास दिले
याप्रसंगी प्रा. लक्ष्मण शिराळे शिवसेना उबाठाचे राजूभाऊ बुधवत, गजानन जाधव, विजुभाऊ मोरे, श्रीकांत मादनकर, अमोल सुटे, प्रसेनजित बछीरे, अश्फाक खान, ज्ञानेश्वर दूधमोगरे, श्रीमती तारामती जायभाये, लीलाताई मते, शोभाताई पोघे, नंदाबाई नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

