दक्षता जनजागृती सप्ताह सन २०२५ “दक्षता आपली सामायिक जबाबदारी”…
लाच मागणा-या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा…केले आवाहन
केंद्रीय दक्षता आयोगाचे सुचनेनुसार प्रतिवर्षी देशामध्ये सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो त्या नुसार महाराष्ट्र राज्यात दिनांक २७.१०.२०२५ ते ०२.११.२०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताह कालावधीत प्रामुख्याने भ्रष्टाचार विरोधातील कारवाई संबधी विविध माध्यमांद्वारे नागरीकांशी संपर्क साधुन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाचे निमीत्ताने मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी खालीलप्रमाणे संदेश दिलेला आहे.
जनतेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजनगृती करण्याच्या दृष्टीने केंद्रीय दक्षता आयोगाच्या धर्तीवर राज्यात हा सप्ताह साजरा केला जात आहे. हा सप्ताह औपचारिक कार्यक्रम नसून समाजात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव जागृत करण्याचा प्रभावी उपक्रम आहे.
भ्रष्टाचारामुळे विकासाची गती रोखली जाते, सामान्य जनतेचा विश्वास ढळतो आणि सामाजिक असमानता वाढीस लागते. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालणे ही काळाची गरज आहे.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘भ्रष्टाचारमुक्त भारत ‘संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी ही जनजागृती मोहीम अत्यंत महात्वपुर्ण आहे. नागरीकांचा सक्रीय सहभाग, प्रामाणिक आचरण आणि पारदर्शक प्रशासन यांच्या संगमातुनच भ्रष्टाचारमुक्त भारत साकार होऊ शकतो.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून आपण सर्वांनी भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेत, प्रामाणिकता आणि पारदर्शक कारभारातून विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे.
कोणाविरुध्द तकार करता येते- महसुल विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद,
ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, जलसंपदा, भुमी अभिलेख, विदयुत महामंडळ, व्यवसाय विभाग, आयकर विभाग, नगर रचना विभाग, जिल्हा उपनिबंधक विभाग, दुय्यम उपनिबंधक विभाग, अधिकोष विभाग, सहकारी संस्था, राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासनाकडुन अनुदान मिळणा-या सर्व संस्था व शैक्षणिक संस्था सर्व शासकीय कार्यालय तसेच अन्य सर्व महामंडळे, सर्व लोकसेवक व खाजगी व्यक्ती.
बे-हिशोबी संपत्ती – भ्रष्टाचार मार्गाने अधिकारी, कर्मचारी लोकसेवकांनी बेहिशोबी संपत्ती जमविण्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हता पडताळल्यानंतर कार्यवाही करण्यात येते, तकार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते
जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्याचे उद्देशाने भ्रष्टाचारासंबधी माहीती असल्यास अगर लाच मागणा-या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा… असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक बुलढाणा विभागाने केले आहे..

