बेजबाबदार शल्य चिकित्सक व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा…..
डॉ. गोपाल बछिरे
लोणार
जिल्हा शल्य चिकित्सक व लोणार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आपण आपला मनमाणि कारभार सुधारा नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे त्यांनी दिला.
बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार हे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झाल्यापासून मनमानी कारभार करत आहे २०१७ मध्ये १०२ रुग्णवाहिकेवर वाहक म्हणून जिल्ह्यात १५ वाहकांची नियुक्ती केली होती नंतर त्यांना वेळेवर पगार न दिल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या १० फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र आरोग्य आयुक्त यांनी आदेश काढून सदरील रुग्णवाहिकांचे वाहक यांना तात्पुरत्या स्वरूपात पुढील तीन वर्षासाठी रुजू करून घेण्याचे आदेश असताना त्याच बरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने या वाहकांच्या बाजूने निर्णय दिला तसेच सरकारी कामगार अधिकारी यांनी सुद्धा सदरील वाहकांना कमी करण्यात येऊ नये त्याचबरोबर यापूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी यांनी पुढील तीन वर्षाकरिता तात्पुरत्या स्वरूपात या वाहकांची नियुक्ती केली असताना नव्याने रुजू झालेले जिल्हा शैक्षणिक चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी स्वतः काढलेल्या आदेशात पत्राचा संदर्भ स्वतःचेच तोंडी आदेश असा देऊन सदरील १५ वाहकांना दिनांक २५ सप्टेंबर रोजी कामावरून काढण्याचे आदेश काढण्यात आले १०२ रुग्णवाहिका ही गोरगरिबांसाठी आशेची किरण आहे परंतु अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे डॉक्टरांवरील विश्वास तुटत चाललेला आहे म्हणून तत्काळ डॉ. दत्तात्रय बिराजदार त्याचबरोबरव सतत कर्तव्यावर गैरहजर असणारे लोणार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गाडेकर या बेजबाबदार डॉक्टरांना निलंबित करून निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करण्यात यावी ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत डॉ गोपाल बछिरे यांनी दिली.

