बुलढाणा
*बुलढाण्यातील हुल्लडबाजीवर पोलिसांची करडी नजर,… कारंजा चौकात sp निलेश तांबे यांनी केली कारवाई…*
बुलढाणा शहर झालेल बेशिस्त, यापुढे शिस्तीत आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न..
नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली… आचारसंहिताही लागली परंतु अजूनही काही जण भर रस्त्यात बेशिस्तीत वावरताना दिसत आहेत… अश्याना धडा शिकवण्याची वेळ पोलिसावर येऊन ठेपली आहे … शहरातील मुख्य कारंजा चौकात असाच एक प्रकार खुद जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निदर्शनात आला .. कार्यालयीन कामाकाज आटपून जिल्हा मुख्यालय येथे जात असताना कारंजा चौकात काहीजण हुल्लडबाजी करताना दिसून आले.. तेव्हा त्यांनी थांबून प्रकार बघितला… नव्यानेच रुजू झालेले sp काहीजणांना ओळखता आले नाही सिव्हिल ड्रेस मध्ये असल्याने व सायंकाळ ची वेळ असल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही .. फटाके फोडून आरडा ओरड सुरु असल्याने sp ना बेशिस्तपणा दिसून आला .. त्यांनी तातडीने बुलढाणा शहर पोलिसांना बोलावून घेतले व कारंजा चौकातील वाढलेली गर्दी , वाहणांची पार्किंग यावर लक्ष केंद्रित करून कारवाईस सुरुवात केली.. शहरात पोलिसांचा धाक न पाळणारे काहीजण तिथेच थांबून “हम कुछ कम नही” या अविर्भात उभे राहून होते अश्याना चांगलेच सुनावल्या गेले असल्याचे समजते..
असो, जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.. क्राईम रेशो वाढत चाललंय हे स्पष्ट आहे, पूर्वीच्या काळात बुलढाणा शहरासह सर्व तालुके शांतताप्रिय असल्याचे चित्र होते मात्र आता सर्व बदलले असून अल्पवयीन मुले जे शिक्षणापासून दूर गेलेले हे गुन्हेगारीच्या मार्गाने जात असल्याचे चित्र दिसून येत आहे… पूर्वीचा पोलिसांचा असलेला धाक तो कायम करण्यासाठी नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना प्रयत्न करावे लागतील.. तसेच यासाठी जिल्हावासियांना सुद्धा आपल्या पाल्यावर लक्ष ठेऊन तो गुन्हेगारी मार्गाला जात तर नाही ना यावर लक्ष ठेवावे लागेल व शिक्षणावर भर देऊन चांगल्या मार्गाला लावावे लागेल ही जबाबदारी सुद्धा सर्वांनी स्वीकारली पाहिजे..
प्रत्येक क्षेत्रात वाढलेला राजकीय हस्तक्षेप हे मूळ कारण वाम मार्गाला जाण्याचे एक असू शकते.. त्यालाही प्रशासनाने बळी पडू नये असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे..

