बुलढाणा ब्रेकिंग
*वृद्ध आई-वडिलांची मुलाने केली हत्या…. नंतर स्वतः केली आत्महत्या….* चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील घटना…
चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील हत्या व आत्महत्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे …स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांची कुराडीने निर्घून हत्या करून मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सुभाष डीगंबर डुकरे (75), त्यांची पत्नी लता डुकरे (65) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (42) यांचा समावेश आहे. हे तिघेही सावरगाव डुकरेचे रहिवासी आहेत. हत्या , आत्महत्या घटनेचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहे …घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस यंत्रणा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा सुरू आहे. तिन्ही मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी जिल्हा उपरुग्णालय, चिखली येथे हलविण्यात आले आहे.

