-4.1 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

बुलढाणा शहरातील अतिक्रमण कधी हटणार? नागरिकांची नगरपालिकेकडे जोरदार मागणी*

बुलढाणा

*बुलढाणा शहरातील अतिक्रमण कधी हटणार? नागरिकांची नगरपालिकेकडे जोरदार मागणी*

बुलढाणा शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठ परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी तसेच नागरिकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे.

नगरपालिका मुख्याधिकारी यांनी सांगितले की, “शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच नियोजनबद्ध पद्धतीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येईल. नागरिकांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील बसस्थानक परिसर, शंकर नगर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गांधी पुतळा परिसर या ठिकाणी पदपथ व रस्त्यावर अनधिकृतपणे उभारलेल्या फेरीवाले, पत्र्यांच्या शेड्स आणि दुकाने यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. विशेषतः शालेय वेळेत विद्यार्थ्यांना व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

दरम्यान, अतिक्रमणावरील कारवाईसाठी प्रशासनाने विशेष पथक तयार केले असल्याची माहिती मिळाली आहे. कारवाईपूर्वी संबंधितांना नोटिसा देऊन नियमानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचेही मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरच शहर अतिक्रमणमुक्त व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या