किशोर गारोळे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहिर पाठिंबा…..
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर टाकला विश्वास
मेहकर/प्रतिनिधी
मेहकर नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस कडून कुरघोडीचे राजकारण सुरू असताना त्याच आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ नेते माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या आदेशानुसार मेहकर नगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्या साठी व किशोर गारोळे यांना मेहकर शहरातून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता मेहकर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष सागर पाटील यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे. या वेळी शहर अध्यक्ष ॲड विजय मोरे, उपाध्यक्ष निसार अन्सारी, उपाध्यक्ष गोविंदराव खोटरे, रहिम तुकडू गवळी, मेहकर शहर कार्याध्यक्ष यासिर खान, शेख मुक्तार, सुनीता पवार, सद्दाम कुरेशी, राजुभाऊ जाधव, फिरोज गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी तालुका अध्यक्ष सागर पाटील व ॲड विजय मोरे यांनी सांगितले की महाविकास आघाडी झाली तर ठिक नाही झाली तरी सुद्धा आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहकर नगर परिषद मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे यांच्या पाठीशी ठाम पने उभे राहून त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले तर आमदार सिद्धार्थ खरात साहेब यावेळी म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो व आघाडीत शिवसेनेच्या उमेदवारावर विश्वास ठेवल्या मुळे त्यांना सुद्धा सन्मान जनक जागा देण्यात येतील असे जाहीर केले या वेळी तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव,किशोरभाऊ गारोळे, युवा सेना तालुका अध्यक्ष ॲड आकाश घोडे, विधानसभासभा समन्वयक श्याम पाटील निकम, सर्कल प्रमुख साहेबराव हिवाळे पाटील, रमेशबापू देशमुख, विठ्ठलवाडी चे सरपंच धनराज राठोड, दत्ताभाऊ घनवट, अमोल बोरे, पंडित बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

