निवडणूका एकजूटीने लढविण्याबाबत आवश्यक समन्वय साधण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आगामी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात सर्व निवडणूका एकजूटीने लढविण्याबाबत आवश्यक समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सौ. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे, शिवसेना खासदार श्री. अनिल देसाई व आमदार ऍड. अनिल परब, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री. महादेव जानकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) अध्यक्ष श्री. सचिन खरात आदी मान्यवर उपस्थितीत होते.

