-1.9 C
New York
Saturday, December 13, 2025

Buy now

spot_img

वैज्ञानिक बलून उड्डाण; नागरिकांना सापडल्यास स्थानिक तहसिल, पोलीस स्टेशनला कळवावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*वैज्ञानिक बलून उड्डाण; नागरिकांना सापडल्यास स्थानिक तहसिल, पोलीस स्टेशनला कळवावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*बुलढाणा…

वैज्ञानिक संशोधन हेतूने बलून उड्डाणाचे 25 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे. ही बलून साधने साधारण 30 किमी ते 42 किमी उंचीवर जाऊन प्रयोग पूर्ण झाल्यानंतर पॅराशूटच्या माध्यमातून जमिनीवर उतरवली जातील. या उपकरणांचा बुलढाणा जिल्ह्यात उतरण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांना बलून उपकरणे आढळ्यास तातडीने स्थानिक तहसिल कार्यालय किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), हैदराबाद, भारत सरकारच्या अणु ऊर्जा विभाग (DAE) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक संशोधनासाठी बलून उड्डाणे करण्यात आले आहे. सदर बलून उड्डाणे जिल्ह्यात उतरण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि वैज्ञानिक प्रयोगांचे महत्त्व लक्षात घेऊन तातडीच्या सूचना लागू करण्याचे निर्देश दिले आहे. ते याप्रमाणे.

नागरिकांना बलूनची साधने किंवा पॅराशूटसह उपकरणे सापडल्यास साधने उघडू नयेत, हलवू नयेत किंवा त्यांच्यात छेडछाड करू नये. साधनांमध्ये असलेली महत्त्वाची वैज्ञानिक माहिती नष्ट होण्याची तसेच त्यावर असलेल्या उच्च विद्युत-दबावामुळे इजा होण्याची शक्यता आहे. सदर उपकरांची स्थानिक पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना त्वरित सूचना द्याव्यात. उपकरण सापडलेली ठिकाण, साधनांची स्थिती व उपलब्ध असेल तर शोधकर्त्यांचा संपर्क क्रमांक कळवावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग मो. क्रमांक ७०२०४३५९५४ / ९०११७७७२२३ वर संपर्क साधावा.

Related Articles

ताज्या बातम्या