बुलढाणा..
*जिल्ह्यातील काँग्रेसला पुन्हा जबर धक्का ..*
*काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस सेवादलाचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेस सोडली. .*
*ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश धुमाळ यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. .*

बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसला पुन्हा जबर धक्का बसला असून लोणार चे रहिवासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस सेवादलाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश धुमाळ यांनी मुंबई येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला .. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल पटेल यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा मुंबई मध्ये पार पडला .. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सह इतर नेते उपस्थित होते.. प्रकाश धुमाळ हे गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांचा नावलौकिक आहे… त्यांनी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाचा पुरस्कार केला.. माजी केंद्रीय मंत्री, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.. त्यांनी संघटनेमध्ये अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळून जिल्ह्याचे काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे संघटन सचिव सह विविध ठिकाणी निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळल्या आहे .. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश धुमाळ यांच्या काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे ..

