*नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025; अध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यांसाठी 33 नामनिर्देश पत्र दाखल*
बुलढाणा…
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार दि. 10 नोव्हेंबर 2025 पासून नामनिर्देशपत्र दाखल करणे सुरु झाले असून आतापर्यंत नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यांसाठी 33 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
*नामनिर्देशन पत्र याप्रमाणे :* बुलढाणा येथे नगरपरिषद सदस्यासाठी 3, चिखली येथे अध्यक्षासाठी 1 व सदस्यासाठी 8, लोणार येथे अध्यक्षासाठी 1, मलकापूर येथे सदस्यासाठी 6, मेहकर येथे अध्यक्षसाठी 2 व सदस्यासाठी 8, नांदुरा येथे अध्यक्ष व सदस्यासाठी प्रत्येक 1, शेगांव येथे सदस्यासाठी 6, सिंदखेड राजा येथे सदस्यासाठी 1 असे एकूण नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यासाठी 33 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
00000

