*बुलढाणा फ्लॅश*
*आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित ची युती जाहीर.*….
*मवीआ कायम ठेवत काँग्रेस आणि वंचित ची युती.*
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकसाठी बुलढाण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात काही दिवसांपूर्वी बोलणी झाली होती. या युतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कोट्यातून 50 – 50 फॉर्मुला ही जाहीर करण्यात आला आहे. बुलढाण्यातील 11 नगर परिषदेच्या निवडणुकीत ही युती असेल असं ही यावेळी जाहीर करण्यात आलं.

