बुलढाणा ब्रेकिंग
*वंचित पक्षाचा धक्कादायक निर्णय ….! नगराध्यक्षपदासाठीची संगिता हिरोळे यांची उमेदवारी मागे; निवडणुकीत तिरंगी संघर्ष !*
अँकर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला शिगेला पोहोचता वंचित बहुजन आघाडीने आज मोठा राजकीय धक्का दिला आहे. नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सौ. संगिता अर्चित हिरोळे यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर असल्याने आजच्या निर्णयाने पक्षातील अंतर्गत घडामोडींबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फक्त हिरोळेच नव्हे तर अपक्ष उमेदवार सदस्यसाठी करण बेडवाल, निशांत येरमुले आणि सागर घट्टे यांनीही माघार घेतल्याने लढत आता अधिकच रोमांचक झाली आहे. या माघारीनंतर ही निवडणूक तिरंगी स्वरूपात धगधगणार हे स्पष्ट झाले आहे. अंतिम उमेदवारांची यादी 25 नोव्हेंबरला जाहीर होणार असून बंडखोरांना आवर घालणे हे आता सर्व पक्षांसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले असून शहरातील मतदारांचे लक्ष आता उमेदवारांच्या अंतिम यादीकडे खिळले आहे.

