बुलढाणा ब्रेकिंग
डोमरूळ गावातील ई क्लास जमीन अडाणी ग्रुपला देऊ नये.. अन्यथा बेमुदत उपोषणाचा ईशारा..
सौर ऊर्जा प्रकल्प इतरत्र हलविण्यात यावा..ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी…
जिल्ह्यातील डोम रुळ येथील ग्रामस्थांनी गावानजीक असलेली 20 एकर ई क्लास शेत जमीन अदाणी ग्रुप ला देण्यास मनाई केली आहे त्याबाबत ग्रामपंचायतीमध्ये ठरव सुद्धा घेण्यात आल्याची माहिती आहे.. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
शेतजमिन अदाणी ग्रुप ऑफ कंपनीच्या ताब्यात गेल्यास आमच्या गावाला कुटल्याही प्रकारचो ई-क्लासची जमिन उपलब्ध राहणार नाही. ज्यामुळे भविष्यात तरुणांसाठी व्यायाम शाळा. तसेच गावातील घनकचरा टाकण्यासाठी जागा, कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी गावाला मिळाल्यास त्यासाठी शासकीय जागा, सामाजिक सभागृह, स्मशानभूमीमाटी जागा, महीला बचत गटांना व्यवसाय उभारणीसाठी जागा गावाकडे उपलब्ध राहणार नाही तसेच सदर शेतजमिनीवर सन २०१८-१९ पासुन ५००० पेक्षा जास्त वृक्षाची लागवड ग्रामपंचायत मार्फत MREGS व वनविभागाच्या अंतर्गत लागवड झालेली आहे तसेच यापुर्वीपासूनच बरेच जुने वृक्ष, सदर जमिनीवर आहेत. सदर वृक्ष लागवडीसाठी शासनाचा बराच निधी खर्च झालेला आहे. सदरचा सौर प्रकल्प सदर जमिनीवर झाल्यास वृक्ष तोड होईल यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..
दिलेल्या निवेदनावर सरपंच सह हजारो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी या निवेदनावर काय निर्णय घेतात याकडे डोमरुळ वासियांचे लक्ष लागले आहे.. जर सकारात्मक विचार केला गेला नाही तर ग्रामस्थांनी उपोषणाचा ईशारा दिला आहे..

