-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात रुग्णांची रक्ताविना परवड.*….. *दोन ते तीन वर्षांपासुन रक्तदान करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे किट्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना रक्त मिळेना.*

*बुलढाणा ब्रेक*

*केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात रुग्णांची रक्ताविना परवड.*…..

*दोन ते तीन वर्षांपासुन रक्तदान करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे किट्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना रक्त मिळेना.*

*रक्ताविना अनेक शस्त्रक्रिया रखडल्या, बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची परवड.*

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी असूनही रक्त जमा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे एलिझा किट्स गेल्या दोन ते तीन वर्षापासून शासकीय पुरवठा बंद असल्याने रुग्णांना वेळेत रक्त मिळत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातून दुरून दुरून आलेल्या रुग्णांची रक्तासाठी मोठी परवड होत आहे. याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला मात्र आम्ही बाहेरून हे किड्स खरेदी करत असतो मात्र शासकीय पुरवठा बंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वंदना दिवनाले या महिलेची गर्भाशयाची शस्त्रक्रिया असल्याने तिला सामान्य रुग्णालयाच्या महिला कक्षात दाखल करण्यात आले . मात्र रक्त मिळत नसल्याने तिची शस्त्रक्रिया आता लांबणीवर गेली आहे. अशा अनेक शस्त्रक्रिया रक्त अभावी लांबणीवर पडल्या आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षापासून रक्तपेढीत रक्त जमा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे एलिझा किड्स उपलब्ध नाहीत. मात्र संबंधित प्रशासन या किटस बाहेरून रुग्णांना विकत आणायला लावत आहेत आणि यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत आहेत..

खरंतर बुलढाणा जिल्हा हा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा आहे. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गरीब रुग्णांना रक्त मिळत नसेल तर अशा रुग्णालयाचा काय फायदा अशी भावना रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली .

बाईट्स – रुग्णांचे नातेवाईक,

Related Articles

ताज्या बातम्या