बुलढाणा ब्रेकिंग ….
*चिखलीत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटातच लढत…*
*काँग्रेसची पिछाडी…* काँग्रेसच्या उमेदवाराला शून्य प्रतिसाद..
चिखली नगर परिषदेची निवडणूक रंगात आली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारात चढाओढ सुरु झाली आहे , संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित करणारी चिखली नगरपरिषद ठरत आहे. चिखली नगर परिषद मध्ये महाविकास आघाडी कडून एक उमेदवार निवडणूक रिंगणात असून तो प्रचारात कच्चा दिसून येताना दिसत आहे तर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत असून दोघांतच प्रचार व दांडगा संपर्कामुळे प्रचारात आघाडी घेताना दिसत आहे त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराची पिछाडी दिसून आली आहे.. चिखली शहरातील विकास कामाची गती पाहता भाजप उमेदवार सरस ठरत असल्याने दुरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार तेही सुद्धा सक्रिय व दांडगा संपर्कामुळे पुढे येताना दिसत आहे फक्त काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र आहे..

