-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

देऊळगावराजा नगरपालिकेत तिरंगी लढत… सत्ताधारी व विरोधकामध्ये जुंपली ….

बुलढाणा

देऊळगावराजा नगरपालिकेत तिरंगी लढत…

सत्ताधारी व विरोधकामध्ये जुंपली ….

देऊळगावराजा नगरपालिका किंवा मतदारसंघ हा सतत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याच ताब्यात राहिलेला गड होता.. अलीकडच्या काळात हा गड विरोधकांच्या ताब्यात गेल्याने चित्र बदलले गेले आहे.. सात वर्षानंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे .. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्यात नंतर भाजपच्या ताब्यात नगरपालिका राहिली.. आता नगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे देऊळगावराजा वासियांचे लक्ष लागले आहे.. नगराध्यक्ष पदाचे अनुसूचित जाती आरक्षण असलेल्या नगरपालिकेत नगरविकास आघाडी, महायुती व महाविकास आघाडी अश्या तीन पक्षाच्या तीन महिला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत.. देऊळगावराजा शहरात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांचा दबदबा असल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून माधुरी शिंपने ह्या महिला निवडणूक रिंगणात उतरविल्या आहेत.. तसेच महाविकास आघाडीच्या शोभा कासारे तर विरोधक म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे व शशिकांत खेडेकर यांच्या नगर विकास आघाडीकडून नेहा सुंगत ह्या महिला निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.. विधानसभा तर हातातून गेली मात्र नगरपालिका तरी हातात आली पाहिजे या दृष्टीने विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत तर महाविकास आघाडीच्या शोभा कासारे यांना निवडून आणून नगरपालिका आपल्या खात्यात पडली पाहिजे असे प्रयत्न सुरु आहेत.. प्रचाराच्या रॅली सुरु झाल्या आहेत.. डॉक्टर शिंगणे व डॉक्टर शशिकांत खेडेकर हे दोघेही नेहा सुंगत यांना विजय करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.. तर आ मनोज कायंदे यांची खेळी गुप्त असून ते जोमाने गाठी भेटी घेत माधुरी शिंपणे यांच्या गळ्यात विजयाची माळ कशी पडेल यासाठी प्रयत्न करीत आहेत.. शोभा कसारी यांचा प्रचार मात्र प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत सुरु आहे अशी तिरंगी लढत देऊळगावराजा शहरात दिसून येत आहे .. आता कोण बाजी मारतो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे..

Related Articles

ताज्या बातम्या