-1.9 C
New York
Saturday, December 13, 2025

Buy now

spot_img

जलपुरुष” म्हणून ओळख असलेले माजीमंत्री भारत भाऊ बोंद्रे यांचे निधन……* *वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.*

*बुलढाणा ब्रेकिंग*

*”जलपुरुष” म्हणून ओळख असलेले माजीमंत्री भारत भाऊ बोंद्रे यांचे निधन……*

*वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.*

शरद पवार यांचे खंदे समर्थक व राज्याचे “जलपुरुष” म्हणून ओळख असलेले भारतभाऊ बोंद्रे यांच वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने चिखली येथे निधन झालं. 1967 पासून ते शरद पवार यांच्या सोबत होते व एकनिष्ठ साथीदार म्हणून होते. 1972 साली प्रथम चिखली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले व सलग चार वेळा त्यांनी चिखली विधानसभेचे प्रतिनिधित्व केलं होतं. राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांनी पाट बंधारे मंत्री, उद्योग मंत्री व शिक्षण मंत्री म्हणून पदे भूषवली. पाटबंधारे मंत्री असताना ते बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प, पेनटाकळी प्रकल्प व जिगाव प्रकल्पाचे ते प्रणेते होते. यासह त्यांनी राज्यातील शेकडो प्रकल्पांना त्यावेळी मंजुरी व गती दिली होती. त्यामुळे त्यांना राज्यात “जलपुरुष” म्हणूनही ओळखल्या जात होतं. त्यांच्या निधनाने बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या