रशिया (मॉस्को) तसेच दुबई येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या आरुष व विराज गायकवाड यांचा सन्मान…
- धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न
रशिया येथील मॉस्को दुबई शहरात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फिटनेस एरोबिक तसेच सीबीएसई (CBSE) आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत ब्राँझ मेडल व गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल बुलढाणा येथील अॅड. श्री. शैलेश गायकवाड यांचे चिरंजीव आरुष शैलेश गायकवाड व विराज शैलेश गायकवाड यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला….!
आज दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी दोन्ही खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…!
यावेळी बोलताना आमदार संजुभाऊ गायकवाड म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचा नावलौकिक वाढत आहे. अशा होतकरू खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी येत्या काळात बुलढाणा शहरात प्रशस्त व सुसज्ज जिम्नॅस्टिक हॉलसाठी १ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी अॅड. शैलेश गायकवाड, NIS प्रशिक्षक राहुल पहुरकर, प्रशांत चाफेकर, राज खिल्लारे, श्रीकृष्णा शिंदे, निषाद येरमुले, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
सत्कार सोहळ्यामुळे दोन्ही खेळाडूंचा उत्साह वाढला असून भविष्यातही देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला….!

