-6.1 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*

बुलढाणा,

जिल्हा क्रीडा संकुल व जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यलयात संपन्न झाली.

या बैठकीला समितीचे सदस्य सचिव जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर, सदस्य जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, शिक्षण विभागाच्या जयमाला राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेश एकडे, पोलीस विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यापूर्वी झालेल्या कामांचा आणि जमा खर्चाचा आढावा घेतला. त्यानंतर नगरपरिषदचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर रक्कम भरणा केला असून त्यांच कार्योत्तर मंजुरी देणे, जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथील क्लब हाऊस रंगरंगोटीचा खर्च अदा करण्यास मान्यता देणे, जिजामाता स्टेडीयम येथील क्लब हाउसमधील मोकळ्या जागेवर फॅब्रीकेटींगचे काम करण्यास मान्यता देणे, जिल्हा क्रीडा संकुल येथील जिम कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यास मान्यता देणे, जिल्हा क्रीडा संकुल आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे पोलीस भरती, सैन्य भरती व इतर सराव करणाऱ्या अकॅडमी, ग्रुप यांना अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतच्या नियमावलीस मान्यता देणे, विविध कामांना मान्यता देणे, राज्य क्रीडा विकास निधीतून अर्थसहाय्य मिळण्याकरीता अनुदान मागणी प्रस्ताव सादर करणे, जिल्हा क्रीडा संकुल येथील इमारत व परिसरामध्ये आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे सीसीटिव्ही कॅमेर खरेदीला मान्यता देणे, बॅरीकेटींग तयार करणे, जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडू, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व रंगरंगोटी करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली.

सीसीटिव्ही कॅमेर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथील इमारत व परिसरामध्ये आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे सीसीटिव्ही कॅमेर खरेदीला मान्यता दिली. तसेच बॅरीकेटींग तयार करणे, जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडू, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली. तसेच अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले.

क्रीडा संकुल वापराबाबत नियमावली
जिल्हा क्रीडा संकुल आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे पोलीस भरती, सैन्य भरती व इतर सराव करणाऱ्या अकॅडमी, ग्रुप, प्रशिक्षणार्थी यांना सूचना, अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतच्या नियमावलीस जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी मान्यता दिली.
०००

Related Articles

ताज्या बातम्या