तहसील कार्यालयात पाल ठोकून झिंगे-बोबींल भुजो आंदोलनाच्या धास्तीने 67 विवरा अतीवृष्टी धारकांच्या बॅक खात्यात 4 लाख 67 हजार रुपये जमा…
उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दिवसांत पैसे जमा न झाल्यास आंदोलनावर ठाम
मलकापुर – तालुक्यातील ग्राम विवरा येथे दि 16 सप्टेंबर 25 रोजी ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाली अतीवृष्टीने शेतातील उभी पिके वाहून शेतजमीनी खरडून गेल्या रहिवासी ग्रामस्थांचे घरांत पाणी गेल्याने अन्नधान्यासह जिवनावश्यक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानीची पाहणी करण्याकरीता पालकमंत्री सावकारे,आ.चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तत्कालीन तहसीलदार राहुल तायडे तलाठी मंडळ अधिकारी आदींनी भेटी देत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले चार महिने उलटून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख गजानन ठोसर , शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहर प्रमुख हरिदास गणबास सह शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली.ग्रामस्थांसह शुक्रवार रोजी तहसील कार्यालय आवारात पाल ठोकून झिंगे बोंबील भुजो आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय महसूल अधिकारी संतोष शिंदे यांना दि.15 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे दिला होता. शिवसेना (उबाठा)च्या या अनोख्या आंदोलनाच्या धास्तीने दि.17 डिसेंबर 25 रोजी दुसऱ्याच दिवशी तब्बल 04 लाख 67 हजार रुपये 67 अतीवृष्टीधारकांच्या खात्यात जमा झाले असल्याची माहिती देत उर्वरित नुकसानग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसात पैसे जमा होणार असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले.दोन दिवसांत उर्वरित अतीवृष्टीधारकांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास तहसील कार्यालय आवारात पाल ठोकून झिंगे बोंबील भुजो आंदोलनावर ठाम असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी सांगितले आहे.

