11.9 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

*तूर पिकामध्ये गांजाची लागवड…स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…* *साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त….*

बुलढाणा ब्रेक..

*तूर पिकामध्ये गांजाची लागवड…स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…*

*साडेबारा लाखाचा मुद्देमाल जप्त….*

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून अंमली पदार्थ असलेल्या गांजाची तुरीच्या पिकातील लागवड मोडीत काढली आहे. ८१.६२ किलोग्रॅम वजनाची व साडेबारा लाखांचा ओल्या व सुक्या गांजाचा मुद्देमाल जप्त करीत, आरोपी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर यासंदर्भात मलकापूर पांग्रा येथील पोलिस चौकी संदर्भात संशयास्पद चर्चांनी वेग घेतला आहे.
साखरखेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मलकापूर पांग्रा शिवारात आरोपी सुधाकर संपतराव गायकवाड, वय ६५ वर्षे ह्या शेतकऱ्याने गट नंबर ५०६ मधील शेतात तूर पिकासोबतच गांजाची लागवड केलेली आहे. अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना मिळाली. कर्मचाऱ्यांना गुप्तपणे पाठवून स्थानिक गुन्हे शाखेने खातरजमा केली. त्यावरुन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्या शेतात धाड टाकली. मादक वनस्पती असलेल्या गांजाची ७६ किलो ०६ ग्रॅम ओली झाडे, किंमत अंदाजे ११ लाख ४० हजार ९०० रुपये व ५ किलो ५६० ग्रॅम कोरडी झाडे, किंमत अंदाजे १ लाख ११ हजार २०० रुपये असा एकूण ८१.६२ किलोग्रॅम वजनाची व १२ लाख ५२ हजार १०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वयस्कर शेतकरी सुधाकर संपतराव गायकवाड यास ताब्यात घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या