11.6 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;* *जिल्ह्यात 115 उमेदवारांमध्ये लढत तर 72 उमेदवारांची माघार*

*विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;*
*जिल्ह्यात 115 उमेदवारांमध्ये लढत तर 72 उमेदवारांची माघार*

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी 72 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे सातही मतदारसंघाकरिता आता 115 उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे.

*नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, ते याप्रमाणे :* मलकापूर येथे 7, बुलढाणा येथे 8, चिखली येथे 18, सिंदखेड राजा येथे 18, मेहकर येथे 11, खामगांव येथे 4 व जळगांव जामोद येथे 6 असे एकूण 72 उमेदवारांचे नामनिर्देशन उमेदवारी मागे घेतले.

तर मलकापूर येथे 15, बुलढाणा येथे 13, चिखली येथे 24, सिंदखेड राजा येथे 17, मेहकर येथे 19, खामगांव येथे 18 व जळगांव जामोद येथे 9 असे एकूण 115 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

> *मागे घेतलेले उमेदवार*

*21- मलकापूर विधानसभा मतदारसंघ :* संदिप देविदास फाटे(अपक्ष), मोहम्मद दानीश अब्दुल रशीद (अपक्ष), विरसिंह ईश्वरसिंह राजपुत (अपक्ष), सुनिल वसंतराव विंचनकर (अपक्ष), सचिन दिलीप देशमुख (अपक्ष), सौरभ चंद्रवदन इंगळे (अपक्ष), हरीश महादेवसिंह रावळ (अपक्ष).
*22- बुलढाणा विधानसभा मतदारसंघ :* प्रमोद पुंजाजी कळसकर (अपक्ष), स्वाती विष्णू कंकाळ (अपक्ष), प्रा. सदानंद मन्साराम माळी (अपक्ष), जितेंद्र एन. जैन. (अपक्ष), प्रा. रतन आत्माराम कदम (अपक्ष), ‍विजयराज हरिभाऊ शिंदे (अपक्ष), डॉ. मोबीन खान अय्युब खान (अपक्ष), आरिफ खान विवन खान (अपक्ष).
*23 -चिखली विधानसभा मतदारसंघ :* नरहरी ओंकार गवई (अपक्ष), नाजेमा नाज इम्रान पठाण (अपक्ष), अब्दुल रियाज अब्दुल समद सौदागर (अपक्ष), सौ. वृषाली राहुल बोंद्रे (अपक्ष), रविंद्र नारायण डाळीमकर (अपक्ष), मृत्युंजय संयज गायकवाड (अपक्ष), मनोज सारंगधर लाहुडकर (अपक्ष), सतीश मोतीराम गवई (अपक्ष), बबन डिगांबर राऊत (अपक्ष), विनायक रामभाऊ सरनाईक -अंभोरे(अपक्ष), शरद रमेश खपके (अपक्ष), सिध्दार्थ अंकुश पैठणे (अपक्ष), देवानंद पांडुरंग गवई (अपक्ष), मिलींदकुमार सुधाकर मघाडे (अपक्ष), नितिन रंगनाथ इंगळे-राजपूत (अपक्ष), संजय धोंडु धुरंधर (अपक्ष), अब्दुल वाहीद शे. इस्माईल (अपक्ष), राजेंद्र सुरेश पडघान (अपक्ष).
*24- सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ :* डॉ. मनोरखा रशीदखा पठाण (अपक्ष), शेख रफिक शेख शफी (अपक्ष), अभय जगाराव चव्हाण (अपक्ष), विजय प्रतापराव घोंगे (अपक्ष), मनसब खान सादतमीर खान पठाण (अपक्ष), राजेंद्र मधुकर शिंगणे (अपक्ष), शिवाजी बाबुराव मुंढे (अपक्ष), शिवानंद नारायण भानुसे (संभाजी ब्रिगेड पार्टी), प्रकाश भिवाजी गिते (बहुजन समाज पार्टी), अशोक श्रीराम पडघान (अपक्ष), ज्ञानेश्वर कैलास म्हस्के(अपक्ष), नामदेव दगडू राठोड (अपक्ष), सुनील तोताराम कायंदे (अपक्ष), सुरज धर्मराव हनुमंते (अपक्ष), अंकुर त्र्यंबक देशपांडे (अपक्ष), अल्का रामप्रसाद जायभाये (अपक्ष), भाई दिलीप ब्रम्हाजी खरात (अपक्ष), प्रल्हाद रंगनाथ सोरमारे (अपक्ष).
*25- मेहकर विधानसभा मतदारसंघ :* नरहरी ओंकार गवई (अपक्ष), डॉ. सांची सिध्‍दार्थ खरात (अपक्ष), प्रकाश गणपत अंभोरे (अपक्ष), लक्ष्मणराव जानुजी घुमरे (अपक्ष), मुरलीधर दगडू गवई (अपक्ष), वामनराव सुर्यभान वानखेडे (अपक्ष), डॉ. गोपालसिंह बछीरे (अपक्ष), प्रकाश चिंधाजी गवई (अपक्ष), डॉ. जानु जगदेव मानकर (अपक्ष), रजनिकांत सुधीर कांबळे (राष्ट्रीय समाज पक्ष), कैलास कचरु खंदारे (अपक्ष).
*26-खामगांव विधानसभा मतदारसंघ :* अँड. रवींद्र भोजने(अपक्ष), अमोल अशोक अंधारे (अपक्ष), ‍शिवशंकर पुरुषोत्तम लगर(महाराष्ट नवनिर्माण सेना), किरण रामचंद्र मोरे(अपक्ष).
*27 जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ :* अमित रमेशराव देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माणना), अरुण भिकाजी निंबोळकर(अपक्ष), पवन भाऊराव गवई (अपक्ष), देवानंद शंकर आमझरे (अपक्ष), मंगेश विश्वनाथ मानकर (अपक्ष), डॉ. संदिप रामदास वाकेकर (अपक्ष).
00000

Related Articles

ताज्या बातम्या