*जिल्यातील पहिली 100 रोपांची फळबाग…मयूर चव्हाण गेल्या अनेक वर्षा पासून केली वृक्ष लागवड...*
बुलढाणा जिल्ह्यातील मयूर चव्हाण गेल्या अनेक वर्षा पासून वृक्ष लागवड करत आहे विशेष म्हणजे त्याने लावलेल्या हजारो झाडांपैकी एकही झाड मृत पावलेला नाही..
मयूर चव्हाण यांना निसर्ग संवर्धनाची खूप आवड आहे त्यात लोणार पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी आदरणीय जंगलसिंग राठोड साहेब यांचं त्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन लाभत राहत त्यांच्याच मार्गदर्शन खाली त्यांनी केंद्र टिटवी मधील काही शाळा वृक्षरोपण साठी दत्तक घेतलेल्या आहेत तशेच त्या शाळांमध्ये देखील त्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे.
अश्यातच त्यांची एक नवीन कल्पना फार चर्चेचा विषय ठरत आहे, त्यांनी स्व खर्चामधून सातत्याने 10- 12 दिवस मेहनत घेत जिल्हा परिषद शाळा गोत्रा येथे तब्बल 100 रोपांची फळबाग तयार केली आहे, भविष्यात हे लेकरं आर्थिक रित्या सक्षण नाहीत अश्या लेकरांना त्याच्या माध्यमातून मदत करता येईल असा त्यांचा माणसं आहे, मकरंद अनासपुरे एका व्हिडिओ क्लिप मद्ये म्हणाले आहेत की शाळेत फळबाग तयार करा कदाचीत त्याच अनुषंगाने त्यांनी ही फळबाग तयार केली असावी..
आजच्या जमान्यात अशे निसर्गमित्र सापडणे फार दुर्मिळच स्वतः खर्च करत, स्वतः मेहनत घेत हजारो झाड लावून संवर्धन करणे म्हणजे कमालच म्हणा लागेल, बुलढाणा जिल्ह्यातील या तरुणास आमचा प्रणाम…