बुलढाण्यात पहिल्यांदाच पत्रकारांच्या कुटुंबीयांचा हळदीकुंकू कार्यक्रम
सोमवारी पत्रकार भवनमध्ये आयोजन
बुलढाणा, 22 जानेवारी (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या कुटुंबियांचा स्नेह खऱ्या अर्थाने घट्ट व्हावा, या प्रांजळ भावनेतून जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने येत्या सोमवारी, दि. २७ जानेवारी रोजी ‘पत्रकारांच्या कुटुंबियांचा हळदी कुंकू’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा येथील पत्रकार भवनात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेच्या कालावधीत हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. पहिल्यांदाच पत्रकार कुटुंबियांचा कार्यक्रम होणार आहे, हे विशेष.
मकरसंक्रांतीनंतर पुढील दोन आठवडे ठिकठिकाणी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम होत असतो. या पार्श्वभूमीवर, पत्रकार कुटुंबीयांचा हळदीकुंकू कार्यक्रम होत आहे. पत्रकार एकमेकांना ओळखतात, पण दैनंदिन धावपळीत पत्रकार कुटुंबीयांचे एकमेकांशी ऋणानुबंध पाहिजे तसे प्रस्थापित होत नाहीत. यामुळे, कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत होण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. पत्रकारांची मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने महिला सेलकडून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्ता सौ. शिल्पा किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, “धकाधकीच्या आयुष्यात महिलांनी आरोग्य कसे सांभाळावे?”, या विषयावर मधुमेह तज्ञ डॉ. अश्विनी जाधव, स्त्री रोगतज्ञ डॉ. माधवी जवरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रमुख उपस्थितीत बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या प्रमुख सौ. कोमल झंवर आणि बॉडी बिल्डर मिस ऑलिम्पिया विजेत्या पौर्णिमा सोनुने यांची उपस्थिती राहील. कार्यक्रमासाठी पत्रकार कुटुंबातील सर्व महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे, असे आवाहन सौ. वैशाली रणजितसिंग राजपूत, कु. मृणाल सोमनाथ सावळे जिल्हाध्यक्ष महिला सेल, सौ. उषा चंद्रकांत बर्दे, सौ. गायत्री राजेंद्र काळे, गझल कासीम शेख, सलमाबी वसीम शेख, सौ. यशस्वी राहुल दर्डा, सौ. वैशाली युवराज वाघ, सौ. मनीषा गणेश निकम, सौ. किरण ब्रह्मानंद जाधव, सौ. शुभांगी रवींद्र गणेशे, सौ. प्रतिभा शिवाजी मामनकर, सौ. वैशाली दिलीप तायडे, सौ. रिना जितेंद्र कायस्थ, सौ. मेघा मयूर निकम, सौ. ललिता दीपक मोरे, सौ. वैशाली किशोर खंदारे तथा समस्त महिला सेल बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.