बुलढाणा
बुलढाण्यात त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी…
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव बुलढाणा 2025
माता रमाई यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी गांधी भवन जयस्तंभ चौक येथे संपन्न झाले…
समस्त उपासिका संघाच्या वतीने सावित्रीबाई फुले नगर बुद्ध विहार बुलढाणा येथून दि. 26 जानेवारी पासून विविध स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते.
तसेच दि. 7 फेब्रुवारी 20250 लुंबिनी बुद्ध विहार लुंबिनी नगर येथे सकाळी 11 वाजता रमाई जयंतीच्या निमित्ताने स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये असंख्य महिलांनी सहभागी नोंदविला…
आरोग्य विषयक मार्गदर्शन आणि लहान चिमुकल्या मुलांनी जिजाऊ सावित्री आणि रमाई यांच्या जीवनावर नृत्य सादर करून कार्यक्रमाला बहार आणली…
रमाई जयंतीच्या निमित्ताने सायंकाळी समस्त उपासिका संघ आणि दि. ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा च्या वतीने गांधी भवनाच्या भव्य प्रांगणामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे यांच्या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे साहेब होते. तर उद्घाटक म्हणून दादासाहेब काटकर यांची उपस्थिती होती…
सदर कार्यक्रमात गर्दीने उच्चांक गाठला होता…
समस्त उपासिका संघ, दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट व लोकराजा शाहू फाउंडेशनच्या वतीने समस्त बुलढाणा करांचे मनापासून आभार कुणाल पैठणकर यांनी मानले आहे ..