2.1 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

भारतीय मानवाधिकार संघटन च्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांतभैया डोंगरदिवे

  • भारतीय मानवाधिकार संघटन च्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांतभैया डोंगरदिवे

बहुजन चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून फुले शाहू आंबेडकर चळवळ गतीमान करण्यासाठी अविरत संघर्ष करणारे, बहुजन समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारे सामाजीक कार्यकर्ते प्रशांतभैय्या डोंगरदिवे यांची भारतीय मानवाधिकार संघटनेच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे.
भारत सरकार मान्यता प्राप्त भारतीय मानवाधिकार संघटना हि देश पातळी वरील मानवाच्या हक्क अधिकारासाठी लढणारी एकमेव संघटना आहे. या संघटनेचे गेल्या पाच सात वर्षांपासून प्रशांत डोंगरदिवे हे कार्य करीत असून त्यांनी मानवाचे मूलभूत हक्क, जे सर्व मानवांना जन्मजात असतात. हे हक्क वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीच्या पर्वा न करता. मानवी हक्कांचे संरक्षण करणे यासाठी सरकाराचे दरबारी आपले कर्तव्य बजावले आहे. अशा मानवी हक्कांचे जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार गुलामगिरी आणि छळापासून स्वातंत्र्यमत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काम आणि शिक्षणाचा अधिकार यातनांपासून मुक्तता कोर्ट सुनावणीचा अधिकार,भाषण स्वातंत्र्य मानवी हक्कांचे मुख्य उद्दिष्ट शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणे हे आहे. मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदे:
मानवी हक्क संरक्षण कायदा, व इतर सर्व मानवाधिकार संदर्भात कायद्याचा प्रचार व प्रसार करून मानवी हक्कासाठी अविरत संघर्ष करीत आहे. भारतीय मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सौरव बेरा कलकत्ता, पश्चिम बंगाल यांनी प्रशांत डोंगरदिवे यांच्या कार्याची दखल घेत बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पदी फेर निवड करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.
बुलडाणा जिल्हयातील विविध क्षेत्रात होणारे भ्रष्टाचार, अन्याय अत्याचाराला वाचा फोडुन सामान्य नागरीकांना न्याय देण्यासाठी अविरत संघर्ष करण्यासाठी कटीबध्द असल्याचे मत जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे यानि व्यक्त करुन आपल्या नियुक्ती बद्दल भारतिय मानवाधिकार संघटनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे आभार व्यक्त केले. तसेच भ्रष्टाचार, अन्यायग्रस्त व पीडीतांनी आपल्या न्याय हक्कासाठी निसंकोचपणे भारतीय मानवाधिकार संघटनेची मदत घ्यावी किंवा ८८५५८५०३७८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहण केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या