2.1 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

प्रवीण पहुरकर यांच्या ‘ पेबुळ ‘ या आत्मकथनास शंकरराव खरात राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर..

प्रवीण पहुरकर यांच्या ‘ पेबुळ ‘ या आत्मकथनास
शंकरराव खरात राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर..

आंबेडकरी विचारवंत लेखक प्रवीण पहुरकर यांच्या पेबु ळ या आत्मकथनाला जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांचा प्राध्यापक शंकरराव खरात राज्यस्तरीय उत्कृष्ट आत्मकथन पुरस्कार जाहीर झाला आहे.
ह्या पुरस्काराचे वितरण दिनांक 30 मार्च 2025 रोजी नागपूरला होणार आहे पेबुल हे आत्मकथन पुण्याच्या मैत्री पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले आहे पेबू ळ हे विदर्भातील एकमेव आंबेडकरवादी आत्मकथन असून प्राध्यापक शंकरराव खरात यांच्या नावाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रवीण पहूर कर यांना आपल्या लेखणीचे सार्थक झाल्यासारखे वाटते
या आपल्या पुस्तकाची दखल घेऊन पुरस्कार दिल्याबद्दल आंबेडकरवादी साहित्य मंडळाचे परीक्षकांचे व विशेषतः अध्यक्ष डॉक्टर दीपक कुमार खोब्रागडे सर व प्राध्यापक डॉक्टर विलास तायडे सर यांचे आभार मानून त्यांनी आनंद व्यक्त केला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेक कवी साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे

Related Articles

ताज्या बातम्या