बुलढाणा ब्रेकिंग
*जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सात पिकांनाच संरक्षण…*
*सुधारित पीकविमा योजना : सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी व मकाचा समावेश…*
राज्य शासनाने नुकतीच सुधारित पीकविमा योजना जाहीर केली असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय २४ जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने काढला आहे. या नव्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ पीक कापणी प्रयोगा आधारेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे विविध टप्प्यांवर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपासून शेतकरी वंचित राहणार आहेत. तसेच बुलडाणा जिल्ह्यासाठी फक्त सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी व मका एवढीच पिके खरीप हंगामासाठी संरक्षित करण्यात आली आहेत. शासनाने जाहीर केलेली नवी पीकविमा योजना ही शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणारी असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे….

