8.3 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

14 गावांच्या शेतकऱ्यांसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाण्याच्या मागणीसाठी जीवन संपवणारे शेतकरी कैलास नागरे मृत्यू प्रकरण.*……… *कैलास नागरे यांच्या कुटुंबाचे पालकत्व सरकारने स्वीकारावं, अन्यथा 20 जुलैपासून कैलास नागरे यांच्या पत्नी करणार आमरण उपोषण.*………. *कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांच्यासह रविकांत तुपकर यांचा सरकारला अल्टिमेटम.*….

*बुलढाणा ब्रेकिङ्

*14 गावांच्या शेतकऱ्यांसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाण्याच्या मागणीसाठी जीवन संपवणारे शेतकरी कैलास नागरे मृत्यू प्रकरण.*………

*कैलास नागरे यांच्या कुटुंबाचे पालकत्व सरकारने स्वीकारावं, अन्यथा 20 जुलैपासून कैलास नागरे यांच्या पत्नी करणार आमरण उपोषण.*……….

*कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांच्यासह रविकांत तुपकर यांचा सरकारला अल्टिमेटम.*….

चार महिन्यापूर्वी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील तरुण शेतकरी कैलास नागरे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील 14 गावांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी आत्महत्या केली होती. त्यावेळी संपूर्ण राज्यात हा मुद्दा गाजला होता. कैलास नागरे यांच्या कुटुंबाच पालकत्व स्वीकारण्याची तयारी ही सरकारने दाखवली होती व तस आश्वासन कैलास नागरे यांच्या कुटुंबाला देण्यात आलं होतं. मात्र चार महिने उलटूनही कैलास नागरे यांच्या कुटुंबाचे पालकत्व किंवा मुलांच शैक्षणिक पालकत्व सरकारने स्वीकारलं नाही, म्हणून आज कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे व कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व 20 जुलै पर्यंत सरकारने आमच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारलं नाही तर आम्ही आमच्या घरातच आमरण उपोषण करणार असल्याचं अल्टिमेटम ही दिला आहे..

यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरही होते. ते म्हणाले की, सरकार वेळ काढू धोरण अवलंबत आहे. कैलास नागरे हे शेतकऱ्यांसाठी शहीद झाले . मात्र त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सरकारने सोडलं आहे तात्काळ सरकारने त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व घ्यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर देखील ते आंदोलन करू शकतात…? असा इशाराही रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला.

Related Articles

ताज्या बातम्या