4.8 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

सद्भावना सेवा समिती बुलढाणा आयोजित भव्य संगीतमय शिवपुरण कथेचे – पुष्प पहिले श्रध्दा विश्वास असेल तर भक्त निर्माण होते – बाल संत दीपशरणजी महाराज

सद्भावना सेवा समिती बुलढाणा आयोजित भव्य संगीतमय शिवपुरण कथेचे – पुष्प पहिले

श्रध्दा विश्वास असेल तर भक्त निर्माण होते

– बाल संत दीपशरणजी महाराज

बुलडाणा :-

हिंदु धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो. पार्वतीने याच महिन्यात शिवाला प्रसन्न करुन घेतले. पार्वतीने तप केले या महिन्यात शिवमहापूरण कथा श्रवण करण्याचे महत्व आहे. शिवमहापुराण कथेचे महात्म्य सांगताना दिपशरणजी महाराज म्हणाले की, श्रध्दा व विश्वास असेल तर भक्ती निर्माण होते. मनुष्य जन्म भाग्याने मिळतो व शिवकथा ऐकणे परमसौभाग्याचे आहे.
सद्भावना सेवा समिती द्वारा आयोजित सात दिवसीय शिवमहापूराण कथेमध्ये ते बोलत होते. कथा सुरु होण्यापुर्वी बारा ज्योतीलिंगाचे पुजन व रुद्राभिषेक करण्यात आला. यामध्ये प्रमुख यजमान सौ. निलीमा जयशंकर जैस्वाल, सौ. दिपीका, सागर लक्ष्मीकांत जैस्वाल, सौ. नंदिनी, नितीन जैस्वाल, सौ. प्रतिक्षा गणेश सोनवणे, सौ. कविता, सुरेश नंदलाल जैस्वाल, सौ. कुशी ,अभिजीत जयप्रकाश जैस्वाल, सौ. रेखा प्रकाशचंद्र पाठक, सौ. सितादेवी चंपालाल शर्मा, गिरीधारी शर्मा यांनी रुद्राभिषेक करून पुजन केले. आजच्या दिवसाची जबाबदारी जैस्वाल समाज महिला मंडळाकडे होती. जांगीड समाजाने प्रसाद वितरण केले. बाल संत दिपशरणजी महाराज यांनी “विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा” हे मराठी भजन म्हटले तेव्हा मंडपातील सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. महाराजांनी बुलडाणा शहरातील महिला श्रोता वर्ग खुप चांगला आहे व आदर्श आहे असे प्रशंसोउद्‌गार काढले. जैस्वाल समाज महिला मंडळाच्या सौ. सुवर्णाज्योती जैस्वाल,, श्रीमती रत्ना जैस्वाल, श्रीमती उषा जैस्वाल, श्रीमती प्रेमलता जैस्वाल सौ. अनिता जैस्वाल, सौ. शिल्पा जैस्वाल यांनी रुद्राभिषेक, आरती, पार्थिव शिवलिंग तयार करणे इत्यादीमध्ये सहभाग घेतला

शिवमहापुरण कथेमध्ये महिलांचा प्रचंड उत्साह- श्री. राधेश्याम चांडक

सद्भावना सेवा समिती द्वारा आयोजित शिवमहापुराण कथेमध्ये पहिल्याच दिवशी महिलांचा प्रचंड उत्साह दिसुन आला. बाल संत दिपशरणजी महाराजांच्या प्रत्येक भजनावर महिला प्रतिसाद देत होत्या असे उद्‌गार समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी काढले. यावेळी मराठी भजनाचा आनंद सर्वानी मनापासुन घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या