-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

महिणे उलटले;वाळु/रेती निर्गती धोरणा अंतर्गत चिखली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळेना रेती….

महिणे उलटले;वाळु/रेती निर्गती धोरणा अंतर्गत चिखली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळेना रेती….

घरकुलांचे कामे रखडल्याने रेती उपलब्ध करुण द्या नितिन राजपुत, विनायक सरनाईक यांची महसुल मंत्र्याकडे मागणी….

५ ब्रास मोफत रेती न मिळाल्यास घरकुल लाभार्थांसह आंदोलन छेडण्याचा इशारा….

चिखली – शासनाने दिनांक ३०.०४.२०२५ रोजी “वाळु/रेती निर्गती धोरण २०२५” अंतर्गत राज्यातील विविध घरकुल योजनांतील लाभार्थ्यांना किमान ५ ब्रास वाळु स्थानिक वापरासाठी मोफत उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.मात्र यासाठी नूसत्याच राज्यस्तरावर बैठका घेऊन गाजावाजा करण्यात आला प्रत्यक्षात मात्र घरकूल बांधकामासाठी एक ही लाभार्थ्यांला मोफत रेती मिळाली नाही.या लाभार्थी यांची तालुका प्रशासनाने यादी बनवली मात्र रेती मिळाली नसल्याने लाभार्थी यांना घरकुल बांधकामासाठी चुरीचा वापर करावा लागतो किवा चढ्या भावाने रेती घ्यावी लागती आहे.ऐन पावसाळ्याचे दिवस आणि घरकुल काम रखडल्याने राहण्यासाठी घरे भाड्याने नागरीकांना रहावे लागत आहे.मागील आठवड्यात महसुल मंत्री बावनकुळे दौऱ्यावर असतांना असे वाटले होते लाभार्थीयांचा रेतीचा प्रश्न सुटेल मात्र महसुल मंत्री आल्यानंतर सुद्धा हा प्रश्न सुटला नसल्याने चिखली तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांना निर्गती धोरणा अंतर्गत मोफत ५ब्रास रेती/वाळु उपलब्ध करूण देण्यात यावी,तयार असलेल्या यादी नूसार घरकुल धारकांना पासेस वितरीत करण्यात याव्यात,रेती बांधकामासाठी जादा दराने रेती खरेदी करावी लागत असल्याने लिलाव तातडीने करण्यात यावा अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक यांनी तहसिलदार यांच्या मार्फत महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दि२५ऑगस्ट २०२५ रोजी केली आहे.

चिखली तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई/शबरी/मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल मंजुर करण्यात आलेले आहेत.त्या लाभार्थांना मोफत रेती उपलब्ध करुण देण्यासंदर्भात प्रशासन व शासन स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत.यामुळे अनेकांना असे वाटले होते की,प्रशासन पास देईल आणि मोफत रेती मिळेल मात्र अनेक महिणे उलटून देखील कागदं काळे करण्यावेतीरीक्त एक खडा सुद्धा रेती लाभार्थी यांना उपलब्ध करुण देण्यात आली नाही.रेती घाट सुद्धा खुले करण्यात आले नसल्याने
जास्तीचे पैसे मोजून रेती उपलब्ध करावी लागत आहे.मात्र दुसरीकडे धोरण ठरुण देखील प्रशासनाकडून मोफत रेती उपलब्ध करुण दिली जात नसल्याने अनेकांनी ना इलाजस्तव चुरी चा वापर करुण बांधकाम करावे लागले आहे.तर आजही शासनाकडून रेती मिळेल या अपेक्षेवर लाभार्थी बसले आहे.यामुळे घरकुल कामे रखडुन पडली आहे.शासनाच्या या धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने शासनाप्रती रोष निर्माण होत आहे.यापुर्वीच प्रशासनाने संयुक्तपणे ८३०० घरकूल लाभार्थी यांना अंदाजे ४१५०० ब्रास रेती उपलब्ध करूण देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.मात्र यावर आज पर्यत कसलीही कार्यवाही झाली नसून नव्याने ४००० लाभार्थी यांचा समावेश यामध्ये झाला असे असतांना एकही लाभार्थी यांना रेती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने १२,३०० लाभार्थी संख्या बगता ऐवढ्या मोठ्या प्रमाणात मोफत रेती मिळणार का?असा सवाल विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी उपस्थित केला असून घरकुल लाभार्थी यांच्या सादर केलेल्या यादीनुसार वाळु/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत चिखली तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांच्या पासेस तयार करण्यात येवून घरकुलांसाठी ०५ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावी,ज्यांनी या धोरणानंतर घरकुल बांधकामासाठी चुरी वापरली किवा रेती वापरली त्यांना ५ ब्रासची रक्कम अनुदान म्हणून देण्यात यावी,रेती घाट लिलाव सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी नितिन राजपुत,विनायक सरनाईक यांनी तहसिलदार यांच्या मार्फत महसुलमंत्री यांच्याकडे केली आहे.मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा किवा स्थानिक तहसिल किवा पंचायत समिती कार्यालयासमोर छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी,पोलीस निरीक्षक चिखली यांना देण्यात आले आहे.

*महसुलमंत्री आले मिळणारी रेती हि बंद करुण गेले….*

अनेकांना असे वाटले होते की,प्रशासन पास देईल आणि मोफत रेती मिळेल मात्र अनेक महिणे उलटून देखील कागदं काळे करण्यावेतीरीक्त एक खडा सुद्धा रेती लाभार्थी यांना उपलब्ध करुण देण्यात आली नाही.महसुल मंत्री दौऱ्यावर असतांना तेव्हा सुद्धा त्यांना या धोरणाबाबत विचारणा करण्यात आली होती‌.मात्र त्यावर आजपर्यत कसलीही कार्यवाही झालेली नाही.वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध पणे रेती विक्री होत आहे.रेती अभावी घरकुलांची व घरांची कामे खोळंबल्याने नाइलाजस्तव चढ्या दराने चोर मार्गाने रेती खरेदी करावी लागते आहे.महसुल मंत्री आल्यावर हि समस्या सुटेल आणि घरकुलांचे रखडलेली कामे सुरू होतील असी अपेक्षा असतांना अवैध रेती वाहतूक बंदचे आदेश महसुल मंत्री यांनी दिल्याने महसुलमंत्री आले अन जिल्ह्यातील रेती बंद करूण गेले असे म्हणायची वेळ घरकुल लाभार्थी यांच्यावर आली आहे.तर काय काशी करायची ती करा पण घलकुलासाठी ठरल्याप्रमाणे ५ब्रास रेती उपलब्ध करूण द्या अशी ओरड होतांना दिसत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या