बुलढाणा
*तुटपुंजी विमा रक्कम मिळाल्याने कृषी विभागात पिक विमा प्रतिनिधींना शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांचा घेराव…*
*उर्वरीत शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यास विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोकण्याचा इशारा….*

शेतकऱ्यांना पिक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने त्याचप्रमाणे काहींची विमा रक्कम पोर्टलवर झिरो दाखवत आहे.अनेकांचा विमा रीजेक्ट दाखवत असल्याने विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याच्या तक्रारी घेऊन कृषी कार्यालयात दि०२सप्टेंबर रोजी विमा प्रतिनिधी यांना *शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक* यांच्या नेतृत्वात घेराव घालीत जाब विचारण्यात आला.पिक विमा न मिळालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना विमा देण्यात यावा,धुऱ्यांला धुरा लागून शेतजमीन आहे क्लेम तारीख एक आहे.असे असतांना कमी जास्त विमा मिळाला असल्याने याबाबत सर्वे फॉर्म चेक करण्यात येवून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी चा प्रस्ताव तक्रार निवारण समिती च्या माध्यमातून शासनास पाठवून उर्वरित विमा रक्कम अदा करण्यात यावी,विमा मिळालेले आणि विमा मिळणेपासून पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी विभाग व विमा कार्यालयात लावण्यात येवून शेतकऱ्यांची हेळसांड थांबविण्यात यावी,अशी मागणी यावेळी *तालुका कृषी अधिकारी,विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी व स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे विनायक सरनाईक यांच्यासह रविराज टाले,भरत जोगदंडे यांच्यासह रानअंत्री,अंबाशी,दिवठाणा येथील शेतकऱ्यांनी केली.* यावर तातडीने उपाययोजना करण्याचे व तक्रार निवारण समितीची बैठक घेण्याचे अश्वासन प्रशासानच्या वतीने देण्यात आले असून शेतकऱ्यांची रक्कम अपलोड होवून आठवडाभरात खात्यात जमा करु असे आश्वासनही देण्यात आले.*मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.*

