येळगाव धरणावर आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला…!
बुलढाणा :
बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवनवाहिनी ठरलेल्या येळगाव धरणावर जलपूजन सोहळा आज दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड तसेच नगराध्यक्षा सौ. पुजाताई संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाले.
पूजनानंतर आमदार श्री.गायकवाड यांच्या हस्ते नारळ अर्पण करण्यात आला, तर माजी नगराध्यक्षा सौ. पुजाताई गायकवाड यांनी पारंपरिक साडीचोळी अर्पण करून जलपूजन विधी पार पाडला.
यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आवाहन केले –
“पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक थेंब जपून वापरणे ही काळाची गरज असून नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. आज पाणी वाचवले तर उद्या पाणी आपले जीवन वाचवेल. चला, आपण सर्व मिळून ‘पाणी अडवा, पाणी जपा’ ही मोहीम यशस्वी करूया.”
या प्रसंगी उपस्थित मान्यवर :
युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना नेते विजय अंभोरे,मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले,संजय हाडे, आशिषबाबा खरात, मोहन पऱ्हाड, बाळू जाधव, गोविंदा खुमकर, दादाराव लवकर, गोपालसिंग राजपूत, विजय काळवाघे,मनोज यादव, गोटू ये्रमुळे, अमोल डंबेलकर, दीपक सोनुने, राजूदादा गायकवाड, अनुजाताई सावळे, पिंटू काटकर, सागर घट्टे, महेंद्र खुरपडे, राजू आराख, जयश्रीताई बोराडे, सरला जाधव, दुर्गा सरदार, शुभांगी भोंडे, ज्योती सानप, शालिनीताई लहाने, अजय बिल्लारी, उदय सुरडकर, अतुल लाहोटी, सचिन गायकवाड, रंजीत गायकवाड, श्रीकांत खेर्डीकर, विजय ईल्लरकर, श्रीकृष्ण शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे, रवी भगत, मयूर वीरशिद, गणेश नाटेकर, शैलेश कुलकर्णी, शेवाळे मामा, गजानन गडाख, राजू अंभोरे, श्रीकांत जायभाये, रोहित गवळी संजय ठाकरे, प्रमोद थोरात, अनुप श्रीवास्तव, ओम शर्मा, गोपाल भाग्यवंत, विजय नेमाडे, निलेश खंडागळे, प्रल्हाद शिंदे, शंतनू गडाख, अमोल कुसुंबे, ग्यारल अण्णा, निखिल कुसुंबे, तुकाराम किकराळे, मनोहर घट्टे यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी तसेच नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

