ब्रेकिंग
*ऍलोपॅथिक डॉक्टरांची संघटनांचा आज राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद.*….
*सी सी एम पी कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीला विरोध.*….
*राज्यातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता.*
राज्य सरकारने राज्यातील सी सी एम पी हा आधुनिक वैद्यक शास्त्रातील एक वर्षाचा ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदणी बुकात करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे आता राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर सुद्धा ऍलोपॅथी औषधांची प्रॅक्टिस करू शकणार आहेत. याला विरोध म्हणून राज्यातील ऍलोपॅथी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन व संलग्नित संघटनांनी विरोध दर्शविला आहे. याला अनुसरून आज राज्यातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालय बंद असणार आहेत. यात बाह्य रुग्णसेवा शस्त्रक्रिया बंद असणार आहेत. यामुळे मात्र राज्यातील रुग्णांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या 24 तासाच्या संपात आकस्मित सेवा वगळण्यात आली आहे. राज्यातील जवळपास दीड लाख ऍलोपॅथी डॉक्टर एक दिवसाच्या संपावर जाणार असल्याने याचा मोठा परिणाम मात्र आज दिवसभर दिसण्याची शक्यता आहे.

