-3.5 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट जेवण; मेहेकर येथील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील प्रकार*….. *आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक केली पाहणी : मुलींच्या समस्या घेतल्या जाणून….*

बुलढाणा ब्रेकिंग

*मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट जेवण; मेहेकर येथील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील प्रकार*…..

*आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक केली पाहणी : मुलींच्या समस्या घेतल्या जाणून….*

 

शासनाचा काेट्यवधींचा खर्च हाेऊनही शासकीय वसतिगृहांत मुला-मुलींना ना धड राहण्याची सुविधा व्यवस्थित मिळते, ना जेवण चांगले मिळते. ही दयनीय स्थिती मेहकर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील आहे. मेहकर – लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी १९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली असता उपस्थित मुलींनी समस्यांचा पाढाच वाचला. नित्कृष्ट जेवण, सडलेले फळे, पातळ दुध, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, स्टेशनरी दिली जात नाही, डाळीत, भातात खडे व कधी-कधी अळ्या असल्याची तक्रार सदर मुलींनी केली….

आमदार सिद्धार्थ खरात यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग बुलढाणा यांना फोन करून येथिल मुलींच्या समस्या सांगितल्या व तत्काळ स्वच्छ आरोचे पाणी, स्वच्छ फळे, आणि दर्जेदार भोजन व्यवस्था, स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले….
मागासवर्गीय मुलींच्या
घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट साेडून पोटासाठी मिळेल ते कामे करावे लागतात. आवड असूनही परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. आज किमान शासकीय वसतिगृहांमुळे राहणे आणि जेवणाची सोय हाेते म्हणून तरी काही गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर पडण्याचे धाडस करत आहेत. आणि मेरिटनुसार शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना साेयी – सुविधांऐवजी विविध समस्यांचाच सामना करावा लागत आहे. जेवणाचा दर्जा सुधारून सामाजिक न्याय मिळणार का?, असा प्रश्न सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मेहकर येथील विद्यार्थिनी उपस्थित केला आहे.

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस खराब होत आहे. याबाबत वसतिगृह वॉर्डनकडे तक्रारी घेऊन गेल्यावर आम्हालाच रागावले जाते. तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले जात असल्याने कितीही समस्या असल्या तरी तक्रार करण्याचे धाडस काेणी करत नाही, असे मुलींनी सांगितले. तर आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, येथिल मुलींची जेवणाची, पिण्याची पाण्याची, राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात यावी, बंद असलेलं फिल्टर तत्काळ सुरू करा, या पुढे जेवण नित्कृष्ट किंवा सडलेले फळे खाण्यास दिले तर गाठ माझ्याशी आहे. मी कोणालाही सोडणार नाही, कारवाई केली जाईल मग मात्र म्हणू नका अशी तंबीच एकप्रकारे आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधितांना दिली. आपण मुलींच्या बाजूने ठाम असल्याचा विश्वास यावेळी आमदार खरात यांनी दिला.

*वसतिगृहातील समस्या : जेवणाचा दर्जा नाही की, सरकारी नियमांप्रमाणे मेनू नाहीत, ग्रंथालयाची सोय नाही.*

*सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी जेवणासाठी दरमहा ४,८०० रुपये दिले जातात. यात नाष्टा, दूध, चहा, दोन वेळचे जेवण आदींचा समावेश असतो. जेवणात पापड, लोणचे, सॅलेड, रविवारी चिकन/मटन, शुक्रवारी अंडाकरी असा समावेश असणे अपेक्षित आहे.*

Related Articles

ताज्या बातम्या