बुलढाणा
खडकपूर्णा नदीत चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधल्याने शेतकऱ्याची 10 एकर शेती गेली खचून…
सिंदखेडराजातील देवखेड येथील शेतकरी हतबल, शासणं दरबारी मारतोय चकरा…

बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य नदी खडकपूर्णा ही नदी सिंदखेडराजा तालुक्यातील मोठ पात्र घेऊन वाहते याचं नदीवर खडकपूर्णा मोठा प्रकल्प बांधलेला आहे गेल्या सात वर्षा अगोदर याच नदी मध्ये देवखेड नजीक चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधल्या गेल्या त्यामुळे नदीला पूर आला किंवा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला की नदी काठची जमीन खचत आहे यात अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खचल्या गेल्या आहेत, शेतकऱ्यांनी पात बांधारे विभागाकडे अनेक वर्षांपासून तक्रारी केल्या त्या तक्रारीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही , शेतकऱ्यांनी आंदोलने केलीत, तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही किंवा कुठलीची कारवाई सुद्धा नाही तसेच खचलेल्या जमिनीचा मोबदला सुद्धा दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांची मुंबईत जाऊन भेट घेतली निवेदने दिली तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही देवखेड येथील शेतकरी हतबल झाले असून शेतकरी प्रवीण सरकटे यांची सात एकर शेत जमीन नदीत खचलेली आहे.. सिंदखेडराजा, बुलढाणा नंतर मुंबई अश्या ठिकाणी आपल्या न्यायासाठी चकरा मारत आहेत अद्यापही शेतकरी न्यायंपाडून वंचित आहेत या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कधीच मिळाला नसल्याची बगावना शेतकरी बोलून दाखवत आहे.. सर्व संघर्ष करावाच लागत आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देऊन देवखेड येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्या कडून होत आहे…

