*गुरुकुल ज्ञानपीठ स्कुल,बुलढाणा येथे चित्रकार, निबंध स्पर्धा आणि स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न !!*
📍गुरुकुल ज्ञानपीठ स्कुल,बुलढाणा
सेवा पंधरवडा व पंडित दीनदयालची उपाध्याय यांच्या जयंती निमित्त बुलढाणा ग्रामीण मंडळाच्या वतीने गुरुकुल ज्ञानपीठ ,सागवन ता.बुलढाणा येथे *भाजपा जिल्हाध्यक्ष विजय राज शिंदे* यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि *गुरुकुल ज्ञानपीठ स्कुल,बुलढाणा अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सचिव डॉ.मधुसूदन सावळे* यांच्या विशेष पुढाकाराने ‘विकसित भारत’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध गटातील शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विकसित भारत या विषयावर चित्र रेखाटले या चित्रकला स्पर्धेचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.व चित्रकला स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी वाटप करून शुभेच्छा दिल्या.
सोबतच स्वच्छ भारत हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यासाठी गुरुकुल ज्ञानपीठ परिसराची विद्यार्थ्यां समवेत स्वच्छता करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी माझ्या सोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि कर्मचारी उपस्थित होते !!

