-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर*….. सरासरी नजर अंदाज पैसेवारी ५२ पैसे इतकी जाहीर..

*खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर*…..

सरासरी नजर अंदाज पैसेवारी ५२ पैसे इतकी जाहीर..

बुलढाणा,
यंदाच्या सन २०२५-२६ च्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण १४२० गावातील नजर अंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार सरासरी नजर अंदाज पैसेवारी ५२ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १४२० गावे असून ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ५८८ आहे. तर ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ही ८३२ आहे.

जिल्हा प्रशासनाने ५० पैसेपेक्षा जास्त व कमी पैसेवारी असलेल्या तालुकानिहाय गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार  ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या बुलढाणा तालुक्यातील ९८ गावाची सरासरी पैसेवारी ५४ पैसे, देऊळगाव राजा तालुक्यात ६४ गावाची सरासरी पैसेवारी ५२ पैसे, सिंदखेड राजा तालुक्यात ११४ गावाची सरासरी पैसेवारी ५५ पैसे, मोताळा तालुक्यात १२० गावाची सरासरी पैसेवारी ५६ पैसे, नांदुरा तालुक्यात ११२ गावाची सरासरी पैसेवारी ५७ पैसे, खामगांव तालुक्यात १४६ गावाची सरासरी पैसेवारी ५९ पैसे, शेगांव तालुक्यात ७३ गावाची सरासरी पैसेवारी ५३ पैसे, संग्रामपुर तालुक्यात १०५ गावाची ५७ पैसे इतकी सरासरी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या चिखली तालुक्यातील १४४ गावाची सरासरी पैसेवारी ४९ पैसे, मेहकर तालुक्यात १६१ गावाची सरासरी पैसेवारी ४६ पैसे, लोणार तालुक्यात ९१ गावाची सरासरी पैसेवारी ४५ पैसे, मलकापूर तालुक्यात ७३ गावाची सरासरी पैसेवारी ४६ पैसे, जळगाव जामोद तालुक्यात ११९ गावाची ४९ पैसे इतकी सरासरी पैसेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या