अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ नुकसान, असंख्य शेती पाण्याखाली..शेतकरी उध्वस्त…
- प्रेमलता सोनोने यांनी केली पाहणी व शेतकऱ्यांशी साधला संवाद...

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे,पिंपळगाव देवी, पिंपरी गवळी व शेलापुर या चार महसूल मंडळात १ नोव्हेंबर २०२५ रात्री दोन वाजेपासून २ नोव्हेंबर २०२५ सकाळी पाच वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका, कपाशी, तूर या पिकांचे जवळपास 700 ते 800 हेक्टर क्षेत्रातील 100% नुकसान झाले आहे. 2 नोव्हेंबर वार रविवार रोजी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा सौ. प्रेमलता सोनोने यांनी आव्हा, टाकळी, माळेगाव, कोल्हे गवळी येथील शेतकऱ्यांच्या समवेत नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झालेले आहे. शेतातील मका, कपाशी, सोयाबीन, हरभरा या सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. कापलेला मका दोन दोन फूट पाण्यात आहे, मक्याच्या पेंड्या वाहून गेलेल्या आहेत, तर काही शेतामध्ये जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे. कपाशीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असून संपूर्ण कपाशी ही जमीनदोस्त झालेली आहे. धामणगाव बढे, पिंपळगाव देवी व शेलापुर या मंडळामध्ये नाल्या काठची काही शेतीतील माती सुद्धा वाहून गेलेली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आभा, टाकळी, माळेगाव, कोली, टाकळी येथील येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी अस्तित्व संघटनेच्या अध्यक्षा सौ प्रेमलता सोनोणे यांनी शेतकऱ्यांचा समवेत केली यावेळी त्यांनी माननीय तहसीलदार साहेब यांना फोनवरून संपर्क करून शेतावर प्रत्यक्षदर्शी पाहणी साठी बोलविले असता मा. तहसीलदार साहेबांनी तत्काळ तिथे भेट दिली. सौ प्रेमलता सोनोने यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी मा. तहसीलदार साहेबांना सरसकट पंचनामे करण्यात यावे तसेच एकही शेतकरी बांधव सुटता कामा नये, विम्याच्या वेळेला चुकीचे व अर्धवट सर्वे झाले होते व अनेक नुकसान ग्रस्त शेतकरी वंचित राहिले होते असे यावेळेस होऊ देऊ नये. शासनाच्या मदतीसाठी अहवाल लवकरात लवकर पाठवून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी मा. तहसीलदार साहेबांनी आम्ही शक्य तितक्या लवकर पंचनामे करून अहवाल लवकरात लवकर सादर करू असे आश्वासित केले. यावेळी मिलिंद पाटील, गजानन कुकडे, उमेश घोंगटे, कृष्णा गवई, कृष्णा घोंगटे, संतोष घोंगटे, अतुल नारखेडे तसेच मालेगांव, सावरगांव, दहीगांव, आव्हा आदि गावातील शेतकरी सुद्धा उपस्थित होते.



