बुलढाणा
संजय रायमुलकर पडले नाहीत त्यांना पाडलं गेलं आणि तेही आपल्याच लोकांकडून..!
*मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगतले वास्तविक…*
मेहेकर येथे शिवसैनिकांचे प्रशिक्षण शिबीर पार पडले, या शिबिराला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आ संजय रायमुलकर आ संजय गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली.. मागील निवडणुकीत काय व कस झाल ही वास्तविकता सर्वासमोर् मांडली….
बाई कशीही असो कपाळावर कुंकू असलं की शोभून दिसतं…. माणूस कसाही असो नकटा – चपटा आपला तो आपला असतो..
बुलढाणा वाले सगळे कलाकार आहेत तुम्ही लोक साधे नाहीत…
आमच्यावर पोलीस केस झाली नाही तर तो शिवसैनिकच होऊ शकत नाही हे आमचे संकल्पना होती.
एका केस मध्ये तर मी ,माझा लहान भाऊ, मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच बेरेक मध्ये आम्ही होतो..
मी बारावी पास झालो कॉलेज शिकू शकलो नाही.. बाळासाहेबांनी मला विधानसभेचे तिकीट दिलं आणि कायदा बनवणाऱ्या मंडळात जाऊन बसवलं…. आता मी मंत्री आहे…. बताओ कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है….. सरकार दोन गोष्टींवर चालतं जीआर वर आणि सीआर वर… और हम जीआर भी निकलते है और तुम्हारा सीआर भी निकालते है…! ही ताकद आहे लोकप्रतिनिधीची….. त्यामुळे फ्रेश रहा कधी जीव जाईल सांगता येत नाही… बघा ना माझा संजय राऊत कसा ऍडमिट आहे ….काय सांगावं तुम्हाला… वो मेरा माल है भाई माल है…. ते वाचलं पाहिजे.. देवाला प्रार्थना केली मी… की त्याला चांगली सद्बुद्धी दे..
आमचे संजय गायकवाड बघा कसे आहेत डॉन…. आम्हाला गुंडा म्हणतात…. अरे शंड असण्यापेक्षा गुंडा असलेला कधीही बरा…. अरे पुत्र हो ऐसा ज्याच्या हाती हो भगवा झेंडा… जो फोडे उबाठा वाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा.
यावेळी गुलाबराव पाटलांनी मंत्री कसं बनलो , एकनाथ शिंदे यांनी रात्रभर कसा आम्हाला जागवलं याचा किस्सा सांगितलं…

