बुलढाणा
*महाराष्ट्रात सर्व प्रथम बुलढाणा येथे विशेष जनजागृती*…आरोग्य शिबीर….

संत गजानन महाराज जेष्ठ नागरिक संघ बुलढाणा महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद (MSPC) व ड्रग इन्फर्मेशन सेंटर (DIC) तसेच वैद्यकीय आघाडी भाजपा यांच्या संयुक्त प्रयत्नाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम दिनांक ०४/११/२०२५ ला अथर्व क्लिनिक बुलढाणा येथे संपन्न झाला…
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. गौरव विजय हरलालका, गणेश बंगाळे, डॉ. प्रकाश पिंपरकर, डॉ. राजेश्वर उबरहंडे, श्री पंजाबराव इलग म्हणुन उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आरोग्याविषयी जागृतीवर आपले विचार मांडले. विशेषतः डॉ. गौरव हरलालका यांनी औषधी घेण्याबाबत त्यांचे गुणधर्म, डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषधी घेऊ नये, औषधांचे कंपनी, कंटेन्स, Expiry Date प्रमाण, त्यांच्या पासुन त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा व लगेचच ती गोळी वापरणे बंद करावी. इ.बाबत सविस्तर माहिती दिली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी औषधांचा सुरक्षित व योग्य वापर तसेच अवंछीत औषध दुष्परिणाम (ADR) इ. बाबत सविस्तर माहिती दिली. शेवटी अशोकराव खेडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. श्री विनायक वरणगांवकर यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. या कार्यक्रमासाठी १०० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रविण पिंपरकर, डॉ. प्राची पिंपरकर, मधुकर टेकाळे, रविंद्र देशपांडे, गजानन निकम, अजय हिवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदरील कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात प्रथम घेण्यात आला. याचे सर्व श्रेय गणेश बंगाळे, डॉ. प्रकाश पिंपरकर व आदरणीय डॉ. गौरव हरलालका यांना जाते.

