-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

जुना अजिसपूर रोड येथे स्पीड ब्रेकर बसविणे व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, जिजामाता नगर परिसरातील नागरिकांची मागणी….*

बुलढाणा

*जुना अजिसपूर रोड येथे स्पीड ब्रेकर बसविणे व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, रस्त्यावरील दिवे सुरु करण्यात यावे.. जिजामाता नगर परिसरातील नागरिकांची मागणी….*

बुलढाणा शहरातील जिजामाता नगर परिसरात विकासाचे कामे झालेत मात्र आता काही बाबीमुळे नगरातील नागरिक त्रस्त  झाले आहेत, जुना अजिसपूर पूर रोडवर वाहणांची वर्दळ वाढली असून भर धाव वेगाने दुचाकी ये जा करीत आहे त्यामुळे या रस्त्यावर दररोज अपघात होत आहे गेल्या महिन्याभरात छोटे मोठे 16 अपघात झाले आहेत .. असंख्य नागरिक जखमी झाले आहेत .. या बाबत सतत नगरपालिकेला निववडणे दिले आहेत मात्र अद्याप पर्यंत नगरपालिकेने कुठलीच दखल घेतली नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त  झाले आहेत तसेच रस्त्यावरील दिवे सुद्धा बंद असतात त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत..

जुना अजिसपूर रोड या मार्गावरील वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांच्या वेगामुळे अपघात वारंवार होत आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या रस्त्यावरून रुग्णालयातील रुग्ण, शिकवणीस जाणारे विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सतत प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्यावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर बसविणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच, या मार्गावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून त्यातून दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण होत आहे. यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

1. जुन्या अजिसपूर रोडवर योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत.

2. रस्त्यालगत कचरा उचलण्याची व स्वच्छतेची नियमित व्यवस्था करण्यात यावी.

3. रस्त्यावर दिवे सुरु करण्यात यावेत, रात्रीच्या वेळी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय

अश्या मागण्या जिजामाता नगर मधील शेकडो नागरिकांनी बुलढाणा नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदना द्वारे केल्या आहेत्, जर मागण्या मंजूर झाल्या नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे..

 

जिजामाता नगर येथील सर्व नागरिक
बुलढाणा
दिनांक : १२/११/२०२५

Related Articles

ताज्या बातम्या