-3.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

बुलढाण्यात अकरा नगरपरिषदांच्या निवडणुका…..* *अद्याप युती आघाड्यांबद्दल निर्णय नाही कार्यकर्त्यांसह उमेदवारही संभ्रमात.*…. *उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही अनुउत्साह.*….

बुलढाणा

*बुलढाण्यात अकरा नगरपरिषदांच्या निवडणुका…..*

*अद्याप युती आघाड्यांबद्दल निर्णय नाही कार्यकर्त्यांसह उमेदवारही संभ्रमात.*….

*उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही अनुउत्साह.*….

बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या नगर परिषदांसाठी फक्त पाच अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत आणि तेही फक्त नगरपरिषद सदस्यांसाठीचे…. जिल्ह्यात अद्यापही महायुती किंवा आघाडीमध्ये समन्वय नसल्याने कुठलाही निर्णय अद्याप होऊ शकला नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांसह उमेदवाराही संभ्रमात असल्याच चित्र आहे. अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राजकीय नेतेही संयमानेच निर्णय घेत असल्याचे चित्र आहे. मात्र अद्याप कुठल्याही नगर परिषदेमध्ये युती किंवा आघाडीची घोषणा न झाल्याने जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही उमेदवारांचा अनुउत्साह दिसत आहे. गेल्या तीन दिवसात फक्त पाच अपक्षांचे नगरपरिषद सदस्यांसाठी अर्ज दाखल झालेले असून नगरपरिषद अध्यक्ष साठी एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही..

Related Articles

ताज्या बातम्या