-3.5 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

लढू आघाडीत पण नगराध्यक्ष शिवसेना उबाठाचाच आमदार सिद्धार्थ खरात

लढू आघाडीत पण नगराध्यक्ष शिवसेना उबाठाचाच
आमदार सिद्धार्थ खरात

लोणार
नगरपालिका नगरपरिषद निवडणूक लढू आघाडीत पण नगराध्यक्ष शिवसेना उभाठाचाच असेल असे वक्तव्य मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार नगरपरिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत केले.

विस्तृत माहिती अशी की लोणार येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणार नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, जिल्हा उपप्रमुख आशिष राहाटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या बैठकीत बोलताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की या मतदारसंघात शिवसेना उबाठाचा मी आमदार आहे आपली प्राथमिकता आघाडीत लढण्याची आहे परंतु मेहकर आणि लोणार येथे नगराध्यक्ष हा शिवसेना उबाठाचाच असेल व दोन्ही नगरपालिकेवर आपलाच झेंडा फडकेल असा विश्वास ही व्यक्त केला त्यांनी पुढे हे सुद्धा सांगितले की, सन्मानाने आघाडी सोबत लढू अथवा शिवसेना उबाठा वेगळी सुद्धा लढू शकते. या ठिकाणी इच्छुक नगराध्यक्ष पदाचे ५ उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाले तर १० प्रभागामध्ये २६ इच्छुक नगरसेवक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले.
या बैठकीचे आयोजन लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी केले होते मंचकावर आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे, जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे, तालुकाप्रमुख राजेंद्र बुधवत, महिला तालुका संघटिका तारामती जायभाये, माजी तालुकाप्रमुख अँड दीपक मापारी, तालुका समन्वय तेजराव घायाळ, युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर, महिला शहर संघटिका पार्वतीताई सुटे, महिला तालुका उपसंघटिका शालिनीताई मोरे, हे उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रमुख गजानन जाधव यांनी केले तर आभार युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर यांनी मांनले

Related Articles

ताज्या बातम्या