बुलढाणा ..
16 हजार रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक पूनम थोरात जाळ्यात..
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करत केली अटक..
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पूनम थोरात हिला 16000 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलं.. एका स्वस्त धान्य दुकानावर कारवाई न करण्यासाठी पुनम थोरात हिने स्वस्त धान्य दुकानदाराला लाच मागितली होती. यावेळी दुकानदाराने बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने काल सायंकाळी स्वस्त धान्य दुकानदाराकडून 16 हजार रुपयांची लाच घेताना पुनम थोरात ला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पुनम थोरात विरुद्ध नांदुरा पोलिसात गुन्हा दाखल करत पुनम थोरातला अटक केली आहे..

